जेंव्हा Miss World Manushi Chillar भेटली मिस युनिव्हर्सला | Manushi Chillar News

2021-09-13 110

सुष्मिता आणि मानुषीच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अवघ्या काही सेकंदांची ही भेट होती. तिला भेटून झालेला आनंद मानुषीच्या चेहऱ्यावरही सहज झळकत आहे. सुष्मिताने नुकताच तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ट्विटरवर शुभेच्छा देताना मानुषीने विमानातील या भेटीचा आवर्जून उल्लेख केला. ती भेट मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, असे तिने लिहिले होते. 1994 मध्ये अवघ्या 16 वर्षांच्या वयात सुष्मिताने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सर्वांची मने जिंकण्याचे कसब अवगत असणाऱ्या सुष्मिताच्या चाहत्यांमध्ये आजही घट झालेली नाही. तर 18 नोव्हेंबर हा दिवस मानुषीसाठी महत्त्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीच्या वाट्याला हे यश आल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळतेय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews